Breaking
नागपूर : विद्यापीठाने दुसऱ्या व तिसऱ्या सेमिस्टरची फी अंतिम सत्राची फी म्हणून ग्राह्य धरावी - SFI


नागपूर : नागपूर विद्यापीठाने दुसऱ्या व तिसऱ्या सेमिस्टरचीच फीस चौथ्या (अंतिम) सेमिस्टर ची फीस म्हणून गृहीत धरावी, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या वतीने कुलगुरूंकडे इ-मेल द्वारे करण्यात आली आहे.


निवेदन म्हटले आहे की, कोरोनाचा परिस्थितीत सर्व शिक्षण व परीक्षा हे ऑनलाईन प्रणाली द्वारे सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदव्युत्तर विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे दुसऱ्या सेमिस्टर ला प्रमोटेड केले आणि तिसऱ्या सेमिस्टरलाही गुगल फॉर्म च्या मदतीने बहुपर्यायी प्रश्नाचा पॅटर्न वापरून परीक्षा घेतल्या. दोन्ही सेमिस्टरला विद्यापीठाला परीक्षांचा कुठलाही खर्च आला नाही. विद्यापीठाला उत्तर पत्रिका (Answer Sheet ), प्रश्न पत्रिका (Question Sheet) व इतर कर्मचाऱ्यांचा कुठलाही खर्च आला नाही. पण या दोन्ही सेमिस्टर ची फीस विद्यार्थ्यांनकडून घेण्यात आली व आता चौथ्या आणि अंतिम सेमिस्टर च्या फीसचा ही नोटिफिकेशन विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. 

कोरोनाचा पहिल्या लाटेने अनेक पाल्यांचे रोजगार हिसकावले तर दुसऱ्या लाटेने तर सर्व जीवनच उध्वस्त केले आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या लोकांचे प्राण सोडतानी बघितले आहे. आणि अश्या सर्व तणावाचा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर आर्थिक भार टाकणे हे अत्यन्त दुर्दैवी आहे, असे एफएसआय ने म्हंटल आहे.

विद्यापीठाने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेमिस्टर चीच फीस ही चौथ्या व अंतिम सेमिस्टर ची फीस म्हणून गृहीत धरावी, अशी विनंती केली आहे. निवेदनात अमित हटवार, संदेश रामटेके, सुरज दूनडे, सागर वाहणे, संघर्ष हटवार, धीरज सिडाम, सुमीत साखरवाडे, योगेश तुम्हाणे, राकेश कापसे, प्रीतम वासनिक, राम येलके यांनी विनंती केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा