Breaking
बेड मिळत नाही ; वडिलांना युपी वरून मुंबईला आणलेमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. अनेक ठिकाणी आयसीयू बेड, इंजेक्शन व ऑक्सिजन यांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे व रुग्णांच्या नातेवाइकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने आपल्या कोरोनाबाधित वडिलांना उत्तरप्रदेशमध्ये कुठेही ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे त्या मुलाने वडिलांना उपचारांसाठी रुग्णवाहिकेने थेट मुंबईत आणले.


उत्तरप्रदेशमधील अयोध्या येथे राहणारे शमशाद खान हे व्यावसायिक बैठकीनिमित्त आसाम येथे गेले होते त्यावेळी त्यांनी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मुलगा सरफराज खान याने उपचारांसाठी अयोध्येत आणले यावेळी अयोध्येतील फैजाबाद येथील कोणत्याही रुग्णालयात त्यांना बेड उपलब्ध झाला नाही त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. परिणामी सलग २६ तास अयोध्या ते मुंबई हा दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून मुलाने आपल्या वडिलांना उपचारासाठी मुंबईत आणले. यामुळे उत्तरप्रदेशमधील आरोग्य यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे होत आहे.


उत्तर प्रदेश मधील कोणत्याच रुग्णालयांमध्ये बेड, व्हेंटिलेटर ऑक्सिजन मिळत नसल्याने अखेर शमशाद यांचा मुलगा सरफराज व भाऊ रिजवान खान यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेने मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला. रुग्णवाहिकेने रुग्ण फैजाबाद येथून मुंबईला नेण्याचे चार लाख रुपये सांगितले. परंतु हेच दर मुंबईतील रुग्णवाहिकेला विचारले असता त्यांनी ७५ हजार रुपयांत रुग्ण मुंबईला आणण्याचे कबूल केले. मुंबईतून तीन ऑक्सिजन सिलिंडर घेऊन दोन वॉर्डबॉय व एक डॉक्टर यांच्यासहीत रुग्णवाहिका फैजाबाद येथे दाखल झाली व सलग २६ तास प्रवास करीत शमशाद यांना उपचारासाठी मुंबईत आणले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा