Breakingपेठ : मधुकर पाडवी यांची बिरसा क्रांती दलाच्या तालुका अध्यक्षपदी निवडपेठ (नाशिक) : बिरसा क्रांती दल पेठ तालुका अध्यक्षपदी मधूकर पाडवी यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दलाचे मनोज पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती. 


यावेळी पेठ तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मधूकर पाडवी हे सामाजिक कार्यकर्ते असून  आदिवासी समाजाबद्धलची त्यांची काम करण्याची धडपड बघूनच पेठ तालुका अध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. पेठ तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. 


तालुका अध्यक्ष मधूकर पाडवी, उपाध्यक्ष रोहन जाधव, सचिव योगीराज भांगरे, कार्याध्यक्ष सोमनाथ सातपुते, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, सहसचिव सागर पालवी, सल्लागार भारत पाडवी, संघटक तुषार चौधरी, प्रसिद्धी प्रमुख सागर वाघेरे, सदस्य अंकुश चौधरी, माणिक भोये, बापू भोये, विश्वास चौधरी, संदिप पाडवी, कांतीलाल भांगरे या प्रमाणे तालुका शाखा कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आली आहे. 


यावेळी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, चिंधू आढळ, कार्याध्यक्ष दादाजी बागूल हे उपस्थित होते. मनोज पावरा यांनी नवनिर्वाचित तालुका पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा