Breakingआमदार अतुल बेनके यांनी केली टोमॅटो पिकाची पाहणीजुन्नर : टोमॅटो पिकावरील झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आमदार अतुल बेनके यांनी येडगाव येडगाव भागातील काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन टोमॅटो पिकाची पाहणी केली.


जुन्नर तालुक्यात दरवर्षी टोमॅटो या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. येडगाव हे टोमॅटो उत्पादनाचे माहेरघर मानले जाते. यंदाच्या वर्षी देखील तालुक्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे. परंतु यंदा या पिकावर एक नवीन विषाणू मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या विषाणूमुळे टोमॅटोची साल प्लॅस्टिकसारखी आढळून येत आहे.


यावेळी शेतकऱ्यांशी चर्चेदरम्यान सदोष बियाणामुळे फळाची साल अशी होत आहे असं शेतकऱ्यांनी सांगितले. सदर विषाणूमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या नवीन विषाणूबाबतच्या उपाययोजना व कारणमीमांसा करणे गरजेचे असल्याचेही आ. बेनके म्हणाले.तसेच यासंबंधी तालुका कृषी अधिकारी सतिश शिरसाठ व कृषी क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करणार आहे असल्याचेही बेनके म्हणाले. तसेच याबाबत प्रशासन पातळीवर तातडीने पाऊले उचलणार आहे. 


या भेटीवेळी येडगावचे उपसरपंच हर्षल गावडे, ग्रा.पं. सदस्य अजित नेहरकर, कृष्णा काशिद, अजिंक्य नेहरकर, चैतन्य नेहरकर, शिवाजी नेहरकर व अन्य शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा