Breaking
संसदेचं बांधकाम स्थगित करा, सर्व जनतेला मोफत ऑक्सिजन, लस द्या - माकप नेते सिताराम येच्युरी


नवी दिल्ली
 : तुम्ही ऑक्सिजन पुरवू शकत नाही. तुम्ही लसींचा पुरवठा करु शकत नाही. तुम्ही औषधं आणि रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध करुन देऊ शकत नाही. तुम्ही कोणत्याच पद्धतीची मदत करु शकत नाही. तुम्ही फक्त खोटा प्रचार, कारणं आणि असत्य गोष्टींच पसरवू शकता,” असा टोला येचुरी यांनी लगावला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका शेर ही लिहिला आहे. “कुर्सी है तुम्हारा जनाज़ा तो नहीं है, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते”, असं ट्विटच्या शेवटी येचुरी यांनी म्हटलं आहे.

मागील महिन्यामध्येच येचुरी यांचा पुत्र आशीष येचुरीचं करोनामुळे निधन झालं. येचुरी यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये डॉक्टर, नर्स, पहिल्या फळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि साफसफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. मुलाची काळजी घेताना त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी या लोकांनी मदत केल्याचं येचुरी म्हणाले होते. 

अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी, “मला माहितीय की मी एकटाच हे दु:ख सहन करत नाहीय. या साथीमुळे असंख्य लोकांचा मृत्यू झालाय,” असं म्हटलं होतं. अन्य एका ट्विटमध्ये येचुरी यांनी संसदेची नवीन इमारत बांधण्यासंदर्भातील खर्चाचा उल्लेख केलाय. “हे बांधकाम थांबवा आणि हा पैसा सर्व भारतीयांना मोफत ऑक्सिजन आणि लसी देण्यासाठी वापरा. ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही मोदींनी आपल्या अहंकारामुळे हे बांधकाम सुरु ठेवलं आहे आणि दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरत आहेत,” असं ट्विट येचुरी यांनी केलं आहे.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही गुरुवारी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं. नवीन संसदभवन आणि पुतळे उभारण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करता येतात आणि लसीकरणासाठी पैसे खर्च करता येत नाहीत का?, असा प्रश्न ममतांनी केंद्र सरकारला विचारला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा