Breaking
आडिवरे येथे विजेचा पोल धोकादायक स्थितीत, प्रशासनाचे दुर्लक्षआडिवरे (दि.१४) : आडिवरे ता.आंबेगाव येथील विजेचा पोल हा धोकादायक स्थितीत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे पुर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

आडिवरे येथे असलेला लोखंडाचा पोल जमिनीलगतच्या तळभागात गंज लागल्याने खराब झाला आहे. स्थानिक प्रशासनाने आणि महावितरण कडून याबाबत कोणतेच लक्ष दिले नसल्याचे बोलले जात आहे.

                                                       

गावात वाढीव वीज बिलांचा प्रश्न तर सुटता सुटत नाही मात्र आत्ता विजेचे पोल धोकादायक स्थितीत आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. जून महिन्यात पासून पावसाळा सुरू होईल. या भागात पावसाचं प्रमाण सर्वाधिक  आहे. तसेच वादळी वारे देखील जाणवतात. अशा परिस्थितीत धोकादायक पोलमुळे जीविताची हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा