Breaking


प्रा. संपत वसावे यांची बिरसा क्रांती दलाच्या अक्कलकुवा तालुकाध्यक्ष पदी निवड


अक्कलकुवा : प्राध्यापक संपत वसावे  यांची बिरसा क्रांती दल अक्कलकुवा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा क्रांती दलाचे नाशिक विभाग प्रमुख व अध्यक्ष  मनोज पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली होती. 


प्रा. संपत वसावे यांना बिरसा क्रांती दलाचे काम आवडते व सुशिलकुमार पावरा सह मनोज पावरा व इतर युवा पदाधिकारी यांच्या कामाने ते प्रभावित झाले. त्यांनी बिरसा क्रांती दल संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली व तालुका कार्यकारिणी तयार करण्यास मदत केली. संपत वसावे यांची आदिवासी समाजाबद्धलची काम करण्याची तळमळ बघून त्यांना अक्कलकुवा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.


अक्कलकुवा तालुका शाखा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

तालुका अध्यक्ष प्रा. संपत वसावे,उपाध्यक्ष नरपत वसावे, कार्याध्यक्ष संदीप पाडवी, सचिव दिलवरसिंग वळवी, सहसचिव संदिप वसावे, सल्लागार दिपक वसावे, संघटक ईश्वर वळवी, प्रसिद्धी प्रमुख रमेश पाडवी, सदस्य मोग्या पाडवी, भिमसिंग वसावे, रविंद्र वसावे, अमरसिंग वसावे, मिलींद वसावे यांची निवड करण्यात आली. 

सभेला बिरसा क्रांती दलाचे युवा राज्याध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे उपस्थित होते. त्यांनी संपत वसावे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या आहेत.   

आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण काम करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष संपत वसावे यांनी सांगितले आहे. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा