Breaking
आदिवासीं समाजाला अपमानास्पद शब्द प्रयोग करुन जातीयवाद निर्माण करणाऱ्या दिपक नवले या व्यक्तीचा जाहीर निषेध - संतोष बोऱ्हाडेपिंपरी चिंचवड : आदिवासीं समाजाला अपमानास्पद शब्द प्रयोग करुन जातीयवाद निर्माण करणाऱ्या दिपक नवले या व्यक्तीचा जाहीर निषेध करत असल्याचे मनसेचे पिंपरी चिंचवड शहर विधानसभा उपाध्यक्ष संतोष बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले.


बोऱ्हाडे म्हणाले, रमेश खरमाळे यांच्या शिवनेरीवरील तोफ गोळे प्रकरणानंतर आरोप - प्रतिआरोप सुरू आहेत. यावेळीच दिपक नवले नामक व्यक्तीने आदिवासी समाजाला उद्देशून अपशब्द वापरले आहे. हे समाजात तेढ निर्माण करणारे आहेत. व आदिवासी समाजाची बदनामी करणारे आहे, त्यामुळे नवले यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही बोऱ्हाडे यांनी केली आहे.


दिपक नवले नामक व्यक्तीने खालील कॉमेंट केली आहेत, " चौकशीला कोण घाबरत. ज्यांनी देशाची सेवा केली, त्या सैनिकावर खोटे आरोप करताना लाज नाही वाटत का. हिम्मत असेल तर चौकशी लावा. जो चांगल काम करतो होते त्याला पाठींबा देण्यापेक्षा, असले फालतू आरोप करताना थोडी लाज बाळगावी. फालतू आदिवासी बिगर आदिवासी क्षेत्र असल घाणेरड राजकारण बंद करा. आम्ही रमेश खरमाळे बरोबर आहोत."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा