Breaking
पुणे : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करा माकपची मागणीपुणे : दरवर्षी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील अनेक विद्यार्थी इंग्लंड, अमेरिका, ओस्ट्रेलिया, युरोप, रशिया तसेच बाल्टिक देशामध्ये उच्च शिक्षणासाठी जात असतात. जानेवारी २०२१ पासून या मुलांनी परदेशी विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली असते. पालकांनी लाखो रुपयांची शैक्षणिक कर्जे घेऊन त्यांना त्या त्या देशात पाठवण्याचे आर्थिक नियोजन केलेले आहे. परंतु परदेशात जाणारे विद्यार्थी आणि इतर नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.


त्यामुळे त्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी आणि आणि संबंधित नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी माकपने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील,   पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे, तसेच याची प्रत उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पाठवली आहे.

 

परदेशी जाणाऱ्या शहरातील विद्यार्थी आणि इतरांसाठी लसीकरणाचा विशेष कक्ष स्थापन करून त्यांना त्वरित लस उपलब्ध करून द्यावी.

- क्रांतीकुमार कडुलकर


सरकारने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यायला हवी होती. अनेक पालक ऑनलाइन लसीकरण करण्यास असमर्थ ठरले आहेत. शहरात सरकारी आणि खाजगी रुग्णालयात लस उपलब्ध नाही. लसीकरण नसल्यामुळे हे विद्यार्थी शहरात अडकून आहेत. त्यांची विमानप्रवासाची तिकिटे त्यांना बुक करता येत नाहीत, त्यांच्या विद्यापीठात शैक्षणिक वर्ग सुरू झाले आहेत. पालक शैक्षणिक कर्जाचे हप्ते भरत आहेत. 


केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाइन हाच एकमेव पर्याय ठेवल्यामुळे परदेशी जाणार्‍या विद्यार्थी आणि इतर नागरिकांची होणारी गैरसोय स्थानिक प्रशासनाने दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे अशीही मागणी माकपने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा