Breaking
पुणे : जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व आशा बुचके यांनी घेतली गृहमंत्री वळसे पाटील यांची भेटसुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी प्रशासनाकडून सहकार्य : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


मंचर : अवसरी फाटा ( ता . आंबेगाव ) येथे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी वळसे पाटील यांची भेट घेऊन जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधित तसेच अन्य रुग्णांवरही उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, अशी मागणी केली.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, देवेंद्र शहा, संतोष खैरे उपस्थित होते.


यावेळी बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, जुन्नर तालुक्यातील शिरोली कोविड उपचार केंद्रासाठी 5 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जातील . नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन कामकाज सुरु होण्यासाठी व नारायणगाव येथे डॉ. संदीप डोळे यांच्या दोन एकर जमिनीत सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. 

बेनके म्हणाले, "जुन्नर तालुक्यात कोविड उपचार केंद्रामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 142 ग्रामपंचायतींनी 15 व्या वित्त आयोगातून आरोग्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. 

यावेळी आशाताई बुचके म्हणाल्या, "तुमच्या नेतृत्वाखाली बेनके यांच्याबरोबर मी यापुढेही राजकारणाविरहीत काम करत राहील. पण जुन्नर तालुक्यातील आरोग्य सुविधाकडे तुम्ही अधिक लक्ष द्या” बुचके यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा