Breaking
पुणे : आशाताई बुचके राष्ट्रवादीत प्रवेश करणार ? गृहमंत्री वळसे पाटील यांची भेटीने चर्चेला उधाण


मंचर
 : अवसरी फाटा ( ता . आंबेगाव ) येथे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी वळसे पाटील यांची भेट घेऊन जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधित तसेच अन्य रुग्णांवरही उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, अशी मागणी केली.

आशाताई बुचके व आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करणार का? या चर्चेला उधाण आले आहे.


आमदार अतुल बेनके यांच्या निवडून येण्यात आशाताई बुचके यांची मते निर्णायक ठरवली होती. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आशाताई बुचके आणि आमदार अतुल बेनके यांची राजकीय जवळीक दिसून येत आहे. अनेक कार्यक्रमांंना उपस्थित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यावरून आशाताई बुचके राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली आहे.

परंतु गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चैदरम्यान आशाताई बुचके म्हणाल्या, तुमच्या नेतृत्वाखाली बेनके यांच्याबरोबर मी यापुढेही राजकारणाविरहीत काम करत राहील. पण जुन्नर तालुक्यातील आरोग्य सुविधाकडे तुम्ही अधिक लक्ष द्या ”. त्यामुळे अजून तरी पक्ष प्रवेशावर अधिकृत निर्णय झाल्याचे दिसत नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा