Breakingरेल्वे रोको शेतकरी आंदोलकांना 2100 प्रत्यकी दंड भरून सुटकानाशिक : 18 फेब्रुवारी 2021  रोजी देशभर दिल्ली शेतकरी आंदोलन ने शेतकरी विरोधी केंद्र सरकारने  केलेल्या कायद्याविरोधात देशभर रेल्वे रोको ची हाक दिली होती. 


नाशिकरोड येथे किसान सभा, बहुजन शेतकरी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी एकत्र येऊन रेल्वे रोखो आंदोलन केले होते. रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये कलम 147, 174, 145 दाखल करण्यात आला होता. यामध्ये आयटक राज्य सचिव राजू देसले, ऍड  माजी नगरसेवक तानाजी जायभावे, माजी उपमहापौर गुलाम शेख, पीआरपी चे गणेश उनव्हणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 


18 फेब्रुवारी 2021 रोजी आज नाशिकरोड आरपीएफ चे ए. एस. आय. सुभाष चंद्रा यांनी मनमाड येथे रेल्वे न्यायालयात न्यायाधीश गणेश घुले न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग लोह मार्ग मनमाड यांचा समोर हजर करण्यात आले. 


दिल्ली शेतकरी आंदोलन समर्थनार्थ व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदा निषेधार्थ आंदोलन केले आहे. हा गुन्हा आम्ही केला आहे, असे राजू देसले, तानाजी जायभावे, गुलाम शेख यांनी सांगितले. गणेश उनव्हणे कोरोटाइन असल्याने व्हाट्सएप वरती सुनावणी झाली.


शेतकरी विरोधी कायद्यासाठी आम्ही आंदोलन केले आहे. असे सांगत गुन्हा कबूल आहे. या वरती न्यायालयाने 2100 रुपये प्रत्यकी दंड करून गुन्ह्यातून मुक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा