Breaking
राजूर : दिव्यांगांचे प्राधान्याने लसीकरण करावे - सुशिलकुमार चिखले


अकोले (अहमदनगर) : प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचे प्राधान्याने लसीकरण करून त्यांना कोरोना टेस्टिंग व उपचाराच्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राजा हरिश्चंद्र बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर संघटनेचे तथा ग्रामसंवाद सरपंच सेवा संघाचे अकोले तालुका अध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असल्याने त्यांना कोरोनाचा अधिक धोका असतो. ही बाब लक्षात घेत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात करावी.

सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना लसीकरणासाठी आठवड्यातील एक दिवस राखीव ठेवावा किंवा दिव्यांगांना घरी जाऊन लसीकरण करावे, अशी विनंती चिखले यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा