Breaking

मे महिन्यात शिधापत्रिकाधारकांना दोन वेळा मिळणार मोफत धान्य, नाही मिळाले तर येथे तक्रार करा !


मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र व गरजू शिधापत्रिकाधारकांना राज्य व केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या योजनानिहाय अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता ‘माझे रेशन माझा अधिकार’ असा मंच करुन स्वयंसेवी संस्थांनी देखील जनजागृती करावी, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत  लाभ पोहोचण्यासाठी शासनास सहकार्य करावे, असे आवाहन शिधावाटप नियंत्रक व संचालक, नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी केले आहे.


राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) गरीब व गरजू पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ मिळावा याकरिता स्वयंसेवी संस्थासमवेत वेबिनारद्वारे ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी पगारे बोलत होते. 

आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एप्रिल व मे 2021 या दोन महिन्यांपैकी एका महिन्याचे प्रति सदस्य 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 35 किलो धान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना माहे मे 2021 करीता अनुज्ञेय असेलेले नियमित अन्नधान्याव्यतिरीक्त प्रति सदस्य प्रति माह 5 किलो अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे. तसेच जून 2021 मध्ये अशाचप्रकारे अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येईल. एनइआरमध्ये वर्ग केलेल्या शिधापत्रिकाधारकांना देखील शासनाच्या देय परिमाणानुसार अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. याची माहिती सर्व स्वयंसेवी संस्थांना देण्यात आली.


🔴 रेशन संबंधी कोणतीही तक्रार असल्यास ती खाली नमूद केलेल्या ठिकाणी करा.

१. वेबसाइट : http://mahafood.gov.in/pggrams/
२. E-Mail :- helpline.mhpds@gov.in
३. हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक :-
१८०० २२ २२६२
४. रेशन कार्यालयात (तहसीलदार कार्यालय) उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात. 
५. प्रत्येक रेशन दुकानात उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात.
६. स्थानिक पोलीस स्टेशनमध्येही लेखी तक्रार करता येते. 
७. आपल्या तक्रारीची एक प्रत (CC) आपल्या संपर्क नंबर सहित खालील ई-मेल वर पाठवा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा