Breakingअजब प्रकार ! रेशन एका गावचे वितरणाचे ठिकाण दुसऱ्या गावात, कोरोना नियमांचा फज्जासुरगाणा : सुरगाणा तालुक्यातील वांगणपाडा ह्या गावातील लोकांना आज रेशन देण्यात आले. हे रेशन गावातच न देता सायळपाडा येथे वितरित करण्यात आले. यावेळी कोरोना नियमांचा फज्जा उलडल्याचे दिसले.


एकिकडे सुरगाणा तालुक्यामध्ये गावा-गावात करोना संक्रमणाची भयानक परिस्थिती आणि ती सांभाळता सांभाळता राज्य शासन आवहान करत आहेत. परंतु रेशन दुकानदार खडकी गावात राहतो, आणि रेशन धान्य वांगणपाडा न वाटता सायळपाडा येथे वाटप करतो. 


रेशन गावाच वितरित करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. रेशन दुकानदार कृष्णा राऊत यांना तरुणांनी चांगलाच दणका दिला. रेशन गावातच मिळावे, तसेच रेशन घेतेवेळी होणारी गर्दी टाळण्याची मागणी केली आहे.


यावेळी वांगणपाडा गावचे पोलीस पाटील नामदेव महाले, सुरेश राऊत, राजू गायकवाड, मनोहर गायकवाड, एकनाथ गवे, राजू महाले, डिंगबर राऊत, कृष्णा गवे, तसेच अन्य तरुण व नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा