Breaking
नताशा नरवालची सुटका करा, जनवादी महिला संघटनेची मागणी


मुंबईयूएपीए सारख्या अत्यंत अन्यायी कायद्याखाली दिल्लीच्या तुरुंगात असलेल्या नताशा नरवालची सुटका करा अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्ष नसिमा शेख व राज्य महासचिव प्राची हातिवलेकर यांनी केली आहे.


नताशा नरवाल यांंना दु:खद धक्का बसला आहे. त्यांना आपल्या कोरोनाने आजारी असलेल्या वडिलांची अखेरची भेटही न झाल्यामुळे झाले आहे.

मुलगी तुरुंगात, मुलगा कोरोना बाधित अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या डॉ. महावीर नरवाल यांनी अखेर मुलीला न भेटताच जगाचा निरोप घेतला. मात्र जाता जाता संबंध देशासमोर आदर्श वडिल म्हणजे काय याचा वस्तुपाठच ते ठेऊन गेले, असेही जनवादी महिला संघटनेने म्हटले आहे.

नताशाची सुटका बघण्याचे भाग्य कदाचित मला मिळणार नाही, असे अत्यंत भावुकपणे म्हणताना तुरुंगात असली तर काय झाले, तो तुरुंग तिला अधिक मजबूत करेल, ती अधिक कणखर होऊन बाहेर येईल, असे अखेरच्या श्वासाला डॉ. महावीर नरवाल म्हणाले.

अशा या लेकीवर डोळस प्रेम करणाऱ्या, कुठल्याही सामाजिक/राजकीय दबावाला बळी न पडता नताशा सहित तुरुंगात विनाकारण डांबून ठेवलेल्या इतर मानवाधिकार कार्यकर्ते, विद्यार्थी, युवा, कलाकार या राजकीय कैद्यांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा