Breaking
कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांना स्मरण पत्र


कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांनी स्मरण पत्र देण्यात आले.


सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक पंचगंगा नदी घाट विकास व सुशोभीकरण कामास दिनांक ४ जानेवारी २०१७ रोजी मंजूरी मिळून विकास कामास सुरुवात झाली होती. पण सन २०२१ साल उजाडले तरीही नदी घाटावर जागेमध्ये काहीच काम झालेले नाही, असा आरोप नागरी कृती समितीने ७ एप्रिल २०२१ रोजी कार्यालयात शिष्टमंडळाद्वारे प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेे. तसेच सदर कामासंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी काम अपूर्ण का आहे याच्या संदर्भात माहिती देऊन व पुढील काम सुरू करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याकडून परवानगी घेण्याची कारवाई तात्काळ करतो असे लेखी आश्वासन दिले होते. 

एक महिना होऊनही कार्यवाही न झाल्याने कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांनी स्मरण पत्र दिले. व सांगितल्याप्रमाणे काम सुरू करण्यासाठी आपल्या खात्यामार्फत परवानगी घेण्यासाठी आपण काय काय प्रक्रिया राबवली आहे व प्रत्यक्ष काम सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे की नाही याचा खुलासा करून कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे हे  पंचगंगा नदी घाट विकासाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनावर अशोक पोवार, रमेश मोरे, प्रवीण पुगांवकर, भाऊ घोडके, अंजुम देसाई, चंद्रकांत पाटील, महेश जाधव, लहुजी शिंदे, राजवर्धन यादव, महादेव पाटील हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा