Breakingरोहीत पावरा यांची बिरसा क्रांती दल नाशिक विभाग उपाध्यक्ष पदी निवड


नंदुरबार : रोहीत पावरा यांची बिरसा क्रांती दल नाशिक विभाग उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. नाशिक विभाग प्रमुख व अध्यक्ष मनोज पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. या सभेत रोहित पावरा यांची नाशिक विभाग उपाध्यक्ष पदी निवडीची घोषणा केली. 


रोहित पावरा हे जिल्हाध्यक्ष नंदुरबार म्हणून काम पाहत होते. त्यांनी जिल्हा स्तरावर उत्तम काम केले म्हणून त्यांना विभाग स्तरावर घेण्यात आले आहे. रोहित पावरा मराठी फिल्म अभिनेता व दिग्दर्शक म्हणूनही ओळखले जातात. एक युवा नेतृत्व म्हणून त्यांची चांगली ओळख आहे. त्यांची वक्तृत्व कला अतिशय चांगली आहे. आपल्या आवाजाने त्यांनी प्रशासकीय अधिका-यांना प्रभावित केले आहे व  आदिवासी समाजाच्या अनेक समस्या सोडवून घेतल्या आहेत. 

सभेला बिरसा क्रांती दलाचे युवा राज्याध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे उपस्थित होते. त्यांनी रोहित पावरा यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या आहेत. 

या सभेला बिरसा क्रांती दलाचे नाशिक विभाग प्रमुख मनोज पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, जिल्हा सचिव विलास पावरा, शिरपूर तालुका सचिव गेंद्या पावरा, साहेबराव पावरा, बागलाण तालुका अध्यक्ष दादाजी बागूल, उपाध्यक्ष हिरालाल गायकवाड, महिला प्रतिनिधी महेश्वरी, अशोक पवार, पेठ तालुका अध्यक्ष मधूकर पाडवी, पुणे जिल्हा संघटक चिंधू आढळ, तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष संपत वसावे, ठाणे जिल्हा महासचिव अनंता जाधव, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष केशव पवार, निफाड तालुक्यातील सोमनाथ चौधरी अन्य उपस्थित होते.

बिरसा क्रांती दल संघटन वाढवणे व आदिवासी समाजाच्या समस्या सोडवणे इत्यादी कामावर आपण अधिक भर देणार असल्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रोहित पावरा यांनी यावेळी सांगितले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा