Breaking
सांगोला : महुद गावचे कर्तव्यदक्ष तलाठी गणेश भुजबळकर यांच्या पाठीशी संपूर्ण गाव


सांगोला (अतुल फसाले): तालुक्यातील जास्त लोकसंख्या आसणाऱ्या गावापैकी महुद गांव आहे. महुद मध्ये गणेश भुजबळकर हे तलाठी म्हणुन काम पहातायत. त्यांच्या कामाच्या पध्दतीमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे त्यांच्या पाठीशी संपुर्ण गाव आसलेचे निवेदन महुद ग्रामस्थांनी तहसीलदार अभिजीत पाटील यांना देण्यात आले.


गणेश भुजबळकर हे तलाठी कामावरती रुजु झालेपासुन संंबंधीत कामांच्या बाबतीत एक वेगळाच ठसा त्यांनी उमटवला आहे. त्यांच्या कार्यालयाशी निगडीत आसणाराा विषयाबाबत ते ताबडतोब नीपटारा करतात. ते सामांन्य नागरीकांना हेलपाटे घालायला लावत नाहीत. जी कामे सनदशीररीत्या बरोबर आहेत व कायद्याच्या व नियमाच्या चौकटीत बसतात ती कामे ते विना दिरंगाईने करतात. मात्र काही कामामध्ये उणीवा आसतील तर त्याबाबत वरीष्ठांशी सल्ला मसलत करुनच व योग्या त्या उणीवा दुर करुनच करतात.

एखादे बेकायदेशीर काम असेल किंवा उणिवा असतील तर अधिकाऱ्यांना निष्क्रिय ठरवले जाते. तसेच बदली करा, निलंबित करा, अश्या मागण्या केला जातात. पण भुजबळकर याला अपवाद ठरलेत 

विशेषता गेले दिड वर्ष कोरोना सारख्या महामारीशी मुकाबला करताना गावपातळीवरील जी ग्रामस्तरीय समिती आहे. त्या समितीने उत्कृष्ट काम करुन लोकांना योग्य मार्गदर्शन, व कोरोना विरोधी लढण्याची मानसिकता केली, यामध्ये भुजबळकर यांचे योगदान बहुमोल आहे. महुद नगरीमध्ये त्यांना "कोव्हिड योध्दा " म्हणूनही गौरवण्यात आले आहे.

निवेदनावर जिल्हा परिषद गटनेते बाळासाहेब पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुर्यकांत घाडगे, सरपंच संजीवनी लुबाळ, उपसरपंच महादेव येळे, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, अँड. धनंजय मेटकरी, पुरोगामी शहराध्यक्ष अशोक येडगे, चिटणीस दादासाहेब महाजन व गावातील व्यापारी, शेतकरी व नागरिकांंच्या सह्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा