Breakingसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ‘एनए’च्या शेऱ्याने नोकरीच्या संधीवरच प्रश्न !


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम सत्र परिक्षेचे निकाल लावण्यास सुरवात केली, पण कोरोनामुळे प्रॅक्टीकलच्या परीक्षांचे गुण विद्यापीठाला मिळालेले नाहीत. त्यामुळे निकाल लावताना गुणपत्रिकेवर प्रॅक्टीकलच्या रकान्यात 'एनए’ म्हणजेच नॉट ॲव्हलेबल असा शेरा मारला आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करत असताना गुणपत्रिकेवरील ‘एनए’ या शेऱ्याने नोकरीची संधी धोक्यात आली आहे. 


कोरोनामुळे गेल्या वर्षभरात महाविद्यालये सुरू होऊ शकली नाहीत. पुणे विद्यापीठात क्रेडिट पॅटर्न असल्याने त्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन व प्रॅक्टिकल या गुणांना महत्त्व आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन वेगवेगळे प्रोजेक्ट देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले. ही विद्यार्थ्यांची कामगिरी प्रथम सत्राच्या निकालात ग्राह्य धरली जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी महाविद्यालायांना प्रोजेक्ट पूर्ण करून पाठविले आहेत.

पुणे विद्यापीठाने एप्रिल महिन्यात पासून प्रथम सत्राची ऑनलाइन परीक्षा घेण्यास सुरवात केली. त्याचे ऑनलाइन निकाल जाहीर केले जात आहेत. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणपत्रिकेत प्रॅक्टीकलच्या रकान्यात नॉट ॲव्हलेबल असा शेरा मारलेला आहे. पण आता त्याचा फटका अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असून, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर यासह इतर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शेवटचे सत्र शिल्लक असतानाच प्लेसमेंटसाठी अर्ज करताना. त्यांना कंपन्यांकडून यावेळी गुणपत्रिका मागविली जाते. अनेक कंपन्या एका विषयात जरी नापास असले तरी विद्यार्थ्यांची निवड करत नाहीत. आता तर सर्वच प्रॅक्टिकलच्या विषयांपुढे एनए असेच दाखविले जात आहे. जेव्हा विद्यापीठाकडून अंतिम सत्राच्या परीक्षा घेतल्या जातील तेव्हाच प्रॅक्टीकलचे गुण देखील त्यात दिसणार आहेत.

कोरोनामुळे प्रॅक्टिकलच्या परीक्षा घेण्यावर मर्यादा आल्या, आता दोन्ही सत्राच्या परीक्षा होणार आहे. गुणपत्रकिकेवर नॉट ॲव्हलेबल असे लिहिले असले तरी प्रॅक्टिकलचे गुण जसे जसे उपलब्ध होतील, तसा निकाल अद्ययावत केला जाईल. विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये.’

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा मंडळ, पुणे विद्यापीठ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा