Breaking
सेटची परीक्षा 26 सप्टेंबरला; ‘या’ तारखेपासून अर्ज नोंदणीला सुरुवात


पुणे  : राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा येत्या २६ सप्टेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी (SET Exam 2021)  १७ मे ते १० जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. यूजीसी महाराष्ट्र आणि गोवा (Goa) या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येते.


गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे सेट परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. ही परीक्षा सर्वात आधी नियमित वेळापत्रकानुसार २८ जून २०२० रोजी आयोजित केली जाणार होती, मात्र करोना संसर्गामुळे ती लांबणीवर पडली होती.


आता विद्यापीठाकडून ३७ व्या सेट परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. २६ सप्टेंबरला महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकूण १५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षे विषयीची अधिक माहिती https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा