Breaking
धक्कादायक : नदीत सापडले ४० मृतदेह ; लाकडे मिळत नसल्याने मृतदेह नदी पात्रातबिहार : बिहार मधील बक्सर जिल्ह्यातील चौसा स्मशान घाटात गंगा नदीत जवळपास ४० मृतदेह तरंगतानाची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.


या प्रकरणावर स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की हे मृतदेह उत्तर प्रदेश मधून वाहून इथे आले आल्याची शक्यता आहे. मी घाटाशेजारी राहणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली आहे, त्यांचं म्हणणं आहे की, हे मृतदेह इथले नाहीत."


मात्र स्थानिकांचे म्हणणे आहे की, पूर्वी या घाटावर दररोज २ ते ३ मृतदेह येत असत मात्र गेल्या १५ दिवसांपासून येथे दररोज १५ मृतदेह आणले जात आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं न मिळाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह गंगेत सोडले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


दरम्यान बक्सरच्या प्रशासनाने या घाटावर जेसीबीच्या मदतीने गड्डे खोदून मृतदेहांना पुरण्याचे काम सुरू केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा