Breaking
आदिवासी भागातील वीजप्रश्न सोडवा ; किसान सभा


घोडेगाव (ता.२८ ) : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील अनेक गावांमध्ये विजेच्या संदर्भात विविध समस्या आहेत, त्या सोडविण्याबाबत किसान सभेने आज घोडेगाव येथील महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता डी.एन. घाटूळे यांना निवेदन दिल्याची माहिती किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे यांनी दिली.


आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील विविध गावांत अनेक वर्षे जे विजेचे प्रश्न प्रलंबित टे त्वरित सोडवावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 


याबाबतचे निवेदन देताना किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी व एस.एफ.आय. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा