Breaking
विशेष लेख : ओळख आई वडिलांची


जरी मनात खूप आशा आकांक्षा असल्या आणि प्रयत्नांचा उत्साह, संस्काराचा सहारा नसला तरी, माणसाला माणुसकीची किंमत राहत नाही, ज्या माणसाला जन्मदात्या आई वडिलांचा अजून सुद्धा आदर करता येत नाही, याची त्याला खात्री होऊन जाते. तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नाही. कितीही शिक्षण द्या आपल्या लेकरांना चांगल्या शाळेत शिकवा, किती ही पैसे लावून त्यांच शिक्षण पूर्ण करा, पण त्याला आई वडिलांच्या संस्काराची जाणीव जर नसेल तर, त्याच्या मिळालेल्या मोठ्यात मोठ्या डीग्रीचा पण काहीच उपयोग नाही. जो मुलगा कमीत कमी शिक्षण घेऊन सुद्धा आई वडिलांच्या कर्तव्याची जाणीव ठेवतो. सुख दुःखाच्या वेळेला आपल्या आई वडिलांचा आधार बनतो, काय बरोबर आहे ? हे कळते. याची त्याला खात्री होऊन जाते. तोच मुलगा आई वडीलांचा अभिमान आहे.


आदर करावा आई वडिलांचा
तेव्हाच त्यांना वाटेल अभिमान
माझ्या मुलाने केला सांभाळ
वाढेल आपल्या घराचा सन्मान..!

कारण शिक्षण जरी त्याच कमी असलं तरी, त्याच्याकडे आई वडिलांच्या संस्काराचं आणि आपल्या जन्माला आल्याच खरच कौतुक वाटणारचं आहे. प्रत्येक मुलगा सारखाच नसतो, प्रत्येक मुलाला आई वडिलांची कदर नसते, पण त्यांनी आपल्याला जन्म दिला. काय वाईट आहे? काय चांगलं आहे?याची ओळख करून दिली, खूप काही कष्ट करून सुद्धा पोटात पोट लहानाचे मोठ करून शिक्षण पुर्ण केलं, मग त्या मुलाला जर आपल्या आई वडिलांबद्दल आदर नसेल किंवा त्यांच्या उपकाराची जाणीव नसेल तर, त्याला पोटचा मुलगा कसे तरी म्हणावे, कारण जन्मदात्त्या आई वडिलांसोबत तो आदराने वागू शकत नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे बोलणे म्हातारपणी देतो, खरचं कोणत्याही गोष्टीची खात्री करून न घेता खरं काय?खोटं काय? माहीत नसून फक्त आई वडिलांविषयी वाईट शब्द काढतो. असे मुले कितीही शिकले तरी काही उपयोगाचे नाही.

जन्मदात्या आई वडिलांची
ठेवावी सर्वांनीच जाणीव
त्यांना पण तुमच्या जन्माची
कधी वाटणार नाही किव..!

कारण माणसाला माणुसकी आणि आपुलकीचे भाव कळले, की तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा राहत नाही. काही लोकांना फक्त पैसाच सर्व काही आहे, असे वाटते. माझ्याकडे खूप पैसा आहे. मी हे घेऊ शकतो ते घेऊ शकतो, ज्याला हा अहंकार आहे. तो किती ही गर्व करत असेल पण त्या व्यक्तीपाशी माणुसकी नावाची गोष्ट नसेल ना वगळावे, तो खूप गरीब व्यक्ती आहे. त्याच्यापेक्षा गरीब कोणीच नाही, म्हणून जन्मदात्या आई वडिलांना हृदयातून ओळखा आणि त्यांच्या संस्काराचं मूल्य जाणून घ्या. नेहमी त्यांचा आदर करा, ते होते म्हणून आपण जन्माला आलो, त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व घडले. ते नसते तर, आपल्यावर चांगले संस्कार पडले नसते, आणि त्यांची किंमत कोणालाच कळली नसती, जो आई वडिलांचे उपकार जाणून मेहनत करेल व आपलं कार्य नेहमी त्यांच्या आशीर्वादाने करीत राहिल. तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आईवडिल हेच आपले दैवत आहे, त्यांचा आशीर्वाद कायम घेत राहावे, आणि चांगले कार्य करत राहावे. यश नक्की मिळणारचं...!

आशीर्वाद आई वडिलांचा
कायम असावा पाठीशी
स्वप्न करणार मी साकार
हेच ध्येय ठेवावे मनाशी..!

✒️  दिपाली मारोटकरअमरावती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा