Breaking
लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन तर्फे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विविध मागण्यांंचे निवेदनडफळापूर (सांंगली) : लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने आज  डफळापूर येथे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या संदर्भात निवेदन जिल्हा अध्यक्षा मिना कोळी, जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी यांनी दिले.


महाराष्ट्र मध्ये जवळपास ७० हजार आशा वर्कर व गटप्रवर्तक या साडेतीन हजार च्या आसपास आरोग्य विभागात काम करत आहेत. या गेल्या वर्ष भरापासून कोरोनाच्या महामारीमध्ये आशा व गटप्रवर्तक या आपल्या जीवाची पर्वा न करता सतत काम करत आहेत. 


आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 


१. आशा व गटप्रवर्तक यांना कोरोना कामाचे दिवसाला ३००रु देण्यात यावे. 

२. आशा व गटप्रवर्तक यांना सुरक्षा साधने देण्यात यावे.

३. आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे 

४. आशा व गटप्रवर्तक यांना सांगली जिल्ह्याप्रमाणे इतर जिल्ह्यात ही ग्रामपंचायत कडून प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे.

५. आशा वर्कर भागात काम करत असताना कोरोना पेशंट कडून आशांना अपमानास्पद वागणूक  व मारहाण केली जाते तरी त्यांना सुरक्षा देण्यात यावे. 

६. आशा वर्कर यांना नगरपालिका नगरपरिषद यांच्या कडून कोरोना कामाचा थकित प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे.


जिल्हा अध्यक्षा कॉ. मिना कोळी, जिल्हा संघटक कॉ. हणमंत कोळी, सरिता पवार, आशा स्वयंसेविका नजमा शेख, मंजिरी छत्रे, राजश्री वाघमारे, वैशाली चव्हाण, दिपाली छत्रे, नेहा भोसले, तेजश्री बोराडे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा