Breaking
बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकारी यांच्या मागणीला यशशिरपूर : शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जामण्यापाडा हे गाव माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चौरस आहार योजनेपासून वंचित होते. जामन्यापाडा गावातील सदस्य तथा बिरसा क्रांती दल - जिल्हा महासचिव विलास पावरा व मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख यांनी सदर योजनेचा लाभ गावातील लाभार्थ्यांना मिळावा याकरीता एकात्मिक बालविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या निवेदनाची दखल घेतली गेली आणि आज जामन्यापाडा येथील अंगणवाडी क्र. 2 येथे चौरस आहार योजनेंतर्गत मिळणारे साहित्य अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या हस्ते व विलास पावरा यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता आणि विलास पावरा यांना पुढील वाटचालीस त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यापुर्वी बिरसा क्रांती दल शिरपूर तालुका व धुळे जिल्हा शाखेने सीडीपीओ शिरपूर व सीईओ धुळे यांनाही निवेदन दिलेले होते.ही मागणी मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख व अध्यक्ष व विलास पावरा महासचिव धुळे जिल्हा  बिरसा क्रांती दल यांनी रेटून ठरली होती. सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांच्या मागणीला यश आले व लाभार्थीस लाभ मिळाला. बिरसा क्रांती दलाच्या या पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा