Breaking

बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीला यश


शिरपूर : शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जामण्यापाडा हे गाव माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चौरस आहार योजनेपासून वंचित होते. जामन्यापाडा गावातील सदस्य तथा बिरसा क्रांती दलाचे जिल्हा महासचिव विलास पावरा व नाशिक विभाग प्रमुख मनोज पावरा यांनी सदर योजनेचा लाभ गावातील लाभार्थ्यांना मिळावा याकरीता एकात्मिक बालविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. 


त्यांच्या निवेदनाची दखल घेतली गेली आणि आज जामन्यापाडा येथील अंगणवाडी क्र. 2 येथे चौरस आहार योजनेंतर्गत मिळणारे साहित्य अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या हस्ते व विलास पावरा यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी बिरसा क्रांती दल शिरपूर तालुका व धुळे जिल्हा शाखेने सीडीपीओ शिरपूर व सीईओ धुळे यांनाही निवेदन दिलेले होते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा