Breakingसुशीलकुमार चिखले यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फाटा देत साजरा केला वाढदिवस


अकोले (अहमदनगर) : सुशीलकुमार चिखले यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फाटा देत वाढदिवस साजरा केला.


अकोले तालुक्यातील सातेवाडी गटातील अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सिमेवर असणारे अतिदुर्गम निसर्गरम्य कुमशेत गाव येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच दिवसांपूर्वी चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून कुटुंबात फक्त  ४ भावंडे असलेल्या नुकसानग्रस्त घराची झालेली मोडतोड बघून त्यांना राजा हरीचंद्र संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुकाअध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी मदत केली.

नुकसानग्रस्त कुटुंबास किराणा किटचे वाटप करून त्यांना सरकार दरबारी मदत मिळवून देण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत, असं सांगून असवले कुटुंबियांचे सांत्वन केले आहे व कुमशेत गावातील नागरिकांना मास्क वाटप करून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

यावेळी गावातील सरपंच,सदस्य यांनी सुशिलकुमार चिखले राष्ट्रवादी युवकचे सातेवाडी गटाचे संघटक संतोष बोटे, महेश शेळके,सद्गुरू देशमुख आदी पदाधिकारी यांचा सत्कार करून कुमशेत गावासाठी  मौलिक मदत केल्याचे नमूद केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा