Breaking
टारझन स्टार जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू, पत्नीसह इतर पाच जणांचा मृत्यूवॉशिंग्टन : टारझन : द एपिक अ‍ॅडव्हेंचर या अफाट गाजलेल्या चित्रपटाचा नायक टारझन जो लारा (वय ५८) यांचा एका विमान अपघातात मृत्यु झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या अपघातातजो लारा यांच्या पत्नी ग्वेन लारा यांच्यासह इतर पाच जणांचा सहभाग आहे.


विकएंडसाठी जो लारा जात असताना, स्थानिक वेळेनुसार शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. लारा हे सेनेना सी ५०१ या छोट्या जेट खासगी विमानाने स्मिर्ना विमानतळावरुन उड्डाण घेतले. ते फ्लॉरिडामधील पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले होते. त्यावेळी टेर्नीजवळील पर्सी प्रिस्ट लेकमध्ये हे विमान कोसळले.


जो लारा यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९६२ रोजी सॅन डिएगो, कॉलिफोर्निया येथे झाला होता. टारझन : द एपिक अ‍ॅडव्हेंचर या चित्रपटातील टारझनच्या भूमिकेने तो जगभर गाजला होता. अमेरिकन सायबॅर्ग : स्टील वॉरियर, स्टील फ्रंटियर, वॉरहेड, आर्मस्ट्रांग, डुम्सडेयर या चित्रपटात त्याने भूमिका केल्या.


१९८९ मध्ये सीबीएस टेलिव्हिजनच्या टारझन इन मॅनहॅटन आणि त्याच्या २२ भागांमध्ये त्याने काम केले होते. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला त्याने संगीत अल्बममध्ये अभियन केला. जो लारा : द क्रॉस ऑफ फ्रीडम हा अल्बमही प्रसिद्ध केला होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा