Breaking
हिना गावित यांच्या निषेधार्थ केले जाणारे आंदोलन स्थगित, हे आहे कारण !


नंदुरबार : डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या समर्थनार्थ व खासदार हिना गावीत यांच्या निषेधार्थ हिना गावीत यांच्या घरासमोर 16 मे रोजीचे निषेध आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे, आंदोलनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, असे बिरसा क्रांती दलाचे जिल्हा प्रवक्ते राजेंद्र पाडवी, रोहीत पावरा, प्रभारी जिल्हाध्यक्ष साहेबराव कोकणी, व कोकण विभाग प्रमुख सुशिलकुमार पावरा यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले. 


पोलीस निरीक्षक तळोदा व धडगाव यांना तशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी भिलीस्थान टायगर सेनेचे तळोदा तालुका पदाधिकारी उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले आहे की, डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्यावर वारंवार विनाकारण खोटे आरोप करून बदनामी करणा-या हिना गावीत खासदार नंदुरबार यांचा निषेधार्थ त्यांच्या घरासमोर जाहीर निषेध आंदोलन बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने केले जाणार होते. सदर निषेध आंदोलनाला 17 आदिवासी संघटनांनी जाहीर पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी होणार होत्या. तरी सध्या कोवीडची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व जनतेच्या हितासाठी आम्ही हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहोत, आंदोलनाची तारीख पुढे ढकलत आहोत. पुढील आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा