Breaking
जुन्नर : ग्रामपंचायत पातळीवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रावबिणारी एकमेव ग्रामपंचायत


नारायणगाव - वारुळवाडी ग्रामपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ


नारायणगाव (जुन्नर) :  ग्रामपंचायत नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायतच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ नारायणगाव येथे जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर व ऍड.राजेंद्र कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आशाताई बुचके म्हणाल्या की, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पातळीवरील व पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रांतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प  व पुढे बायोगॅस निर्मिती प्रकल्प करणारी एकमेव ग्रामपंचायत असुन हा प्रकल्प गावाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल असे सांगत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी सरपंच योगेश पाटे म्हणाले जवळपास २० वर्षांपासुनचा कचरा या कचरा डेपोत असुन या घनकचरा व्यवस्थापनासाठी नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायत मिळुन जवळपास २५ लाख रु प्राथमिक खर्च असुन यापुढे बायोगॅस निर्मिती प्रकल्प करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच नागरिकांनी ओला कचरा, सुका कचरा सेपरेट करावा लवकरच नारायणगाव ग्रामपंचायतकडुन डस्बिनचे वाटप करण्यात येणार असुन ग्रामपंचायतकडुन कचर्‍यात जाणारे प्लास्टिक व मेटल जमा करुन त्याचा मोबदलाही नागरिकांना ग्रामपंचायतकडुन दिला जाणार आहे. ग्रामपंचायत सातत्याने गावाच्या विकासाचे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने सांगितले.

यानिमित्तानं ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, राजेश बाप्ते, गणेश पाटे, जंगल कोल्हे, जालिंदर कोल्हे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, घनकचरा व्यवस्थापनचे खंडागळे, आनंद पोखरणा, अजित वाजगे, भागेश्वर डेरे, किरण ताजणे, ईश्वर पाटे यांसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा