Breakingशहरातील दुसरी लाट ओसरली, 6 हजार 200 बेड रिकामे - आयुक्त राजेश पाटील


पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीस लागला असल्याने बेडची उपलब्धतता वाढली आहे. व्हेंटिलेटर, आयसीयू, ऑक्सीजनयुक्त, सीसीसी सेंटरमध्ये असे 6 हजार 200 बेड शिल्लक असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.


तसेच दुसरी लाट ओसरत आहे. पण, काळजी घ्यावी लागणार. वायसीएमएचा एक मजला वगळून वायसीएमएचसह काही रुग्णालये नॉन कोविड रुग्णांवरिल उपचाराकरिता सुरु केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत अचानक 10 फेब्रुवारी 2021 नंतर पुन्हा झपाट्याने वाढ होऊ लागली. दुस-या लाटेत प्रचंड रुग्णसंख्या वाढली. दिवसाला अडीच ते तीन हजाराच्या पटीत नवीन रुग्णांची भर पडायला लागली. रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णालयात दाखल होणा-यांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. पालिका रुग्णालयातील बेड पूर्ण क्षमतेने भरले. परिणामी, एप्रिलच्या सुरुवातीपासून बेडची कमतरता जाणवू लागली.

वाढत्या रुग्णसंख्येत गंभीर, अतिगंभीर रुग्णांची भर पडत होती. गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेटिंलेटर बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. व्हेंटिलेटरचा एकही बेड मिळत नव्हता.  नागरिकांना बेडसाठी वणवण फिरावे लागत होते.

धावाधाव करावी लागत होती. मागील 20 दिवसांपर्यंत बेडसाठीची हिच परिस्थिती होती. परंतु, मागील दहा दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे बेडची उपलब्धता वाढली आहे. आजमितीला शहरात 6 हजार 200 बेड शिल्लक आहेत.

त्यात 38 व्हेंटिलेटर, 294 आयसीयू, 2 हजार 246 ऑक्सीजन आणि कोविड केअर सेंटरमधील 2 हजार 200 बेडचा समावेश आहे. खासगी रुग्णालयातही काही बेड शिल्लक आहेत. त्यामुळे बेडची कमतरता नाही.  आठवड्याभरात काही रुग्णालये नॉन-कोविड रुग्णांवरील उपचारासाठी सुरु केली जाणार आहेत. वायसीएमएचा एक मजला कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ठेवला जाईल. बाकी मजले नॉन कोविड रुग्णांसाठी उपलब्ध केले जातील”.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा