Breaking
खा. अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेले गाव "मोबाईल नेटवर्क" पासून वंचित


आदिवासी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला मुकले, वर्ष वाया !जुन्नर (पुणे) : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेले कोपरे गाव आजही "मोबाईल नेटवर्क" पासून वंचित आहे. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागले. तसेच खासदार, आमदारांनी येथील पुताचीवाडी आणि जांभूळशी येथे उभे केलेले मोबाईल नेटवर्क टॉवर त्वरीत चालू करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.

महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांनी शिक्षण दारे उघडी केली त्याच महाराष्ट्र मध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ मोबाईल टॉवर उभारून चालू न केल्या कारणाने शिक्षण पासून वंचित राहावे लागले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळा गेली एक वर्ष पासून बंद आहेत. याचा सर्वाधिक फटका कोपरे, मांडवे, जांभूळशी, मुथाळने, या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना बसला आहे. कोणत्याही प्रकारच्या मोबाईल रेंज नसल्या कारणाने एक वर्ष फुकट वाया गेले आहे. जून महिना तोंडावर येऊन ठेपला आहे. हे वर्ष पण फुकट जाते की काय यांची चिंता पालक व्यक्त करत आहे.

जांभूळशी येथे चार वर्षे पूर्वी जियो टॉवर उभा केला. पण तांत्रिदृष्ट्या कारणे सांगून व पुताचीवाडी (मांडवे) या ठिकाणी दुसरा जियो टॉवर उभा केला.  तिथे विद्युत पुरवठ्यासाठी डी. पी. मिळत नाही असे कारण दिले जात आहे. परंतु अद्याप तरी हे दोन्ही मोबाईल टॉवर चालू करण्यात आले नाही.

खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी या गावाला १९ जून २०२० रोजी प्रशासकीय यंत्रणा घेवून गाव भेट दिली व अडीअडचणी समजून घेवूनस सभेला संबोधित करताना 15 दिवसा मध्ये जियो टॉवर चालू करतो असे आश्वासन दिले. वर्षे पूर्ण होत आले पण अद्यापही टॉवर चालू झालेला नाही.

सत्ताधारी आणि विरोधक नेहमीच आदिवासी भागतील प्रश्नांवर चिखलफेक करतात. आदिवासी समाज हा गेली अनेक वर्षे अतिशय शांत आणि प्रगल्भ राहिला आहे. समाजच्या भावना जेव्हा इतक्या तीव्र असतात. तेव्हा लोकप्रतिनिधी, यंत्रणा यांनी अशा विषयाचा "राजकीय खेळ" न मांडता मार्ग काढायचा असतोस असाही तीव्र संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकप्रतिनिधींंनी मोबाईल टॉवर चालू करून करेक्ट कार्यक्रम करावा, अशी मागणी कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे तरुण, तरूणी तसेच रामदास दाभाडे, अशोक दाभाडे, सुनील मरभल, सतीश बुळे, आकाश बुळे, तुषार मुठे, किशोर दाभाडे, सचिन बुळे, चंद्रकांत दाभाडे, मुरली बूळें यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा