Breaking
हे संघी देखील विचित्र प्राणी आहेत - कन्हैय्या कुमारमुंबई : गेल्या काही दिवसांपासून योग गुरु बाबा रामदेव हे त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत आहेत. या वक्तव्यावरून इंडियन मेडिकल असोशिएशन (IMA) देखील आक्रमक झाली असून बाबा रामदेव यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या मुद्द्यावरून कन्हैय्या कुमार यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.

 


जेएनयुचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांनी दोन वेगवेगळे ट्विट करत आपले मत मांडले आहे. पहिल्या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे कि, हे संघी देखील विचित्र प्राणी आहेत. सरकारवर टीका म्हणजे देशाचा विरोध करणे आणि लाला रामदेवांचा विरोध करणे म्हणजे आयुर्वेदाला विरोध मानला जातो, हे लोक भोळे आहेत की चलाख आहेत हे माहित नाही? असा प्रश्न उपस्थित करत आज देशाला बनावट राष्ट्रवादापासून वाचविण्याची आणि ढोंगी बाबांपासून आयुर्वेद वाचवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

 


 तर दुसऱ्या ट्विट मध्ये  "एंटायर पॉलिटिकल सायन्स" च्या चुका लपवण्यासाठी "वैद्यकीय विज्ञान" ला बदनाम केले जात आहे. तसेच हा त्यांचा ‘ध्यान भटकाओ योजना’ चा नवीन भाग आहे असल्याची टीका त्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा