Breakingमहाराष्ट्रात यंदा "या" तारखेला मान्सून दाखल होणार !


पुणे : यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून वेळेत दाखल झाला आहे. त्यामुळे तो केरळमध्येही वेळेवरच म्हणजे १ जून रोजी येईल. तसेच महाराष्ट्रात प्रथम कोकणात ८ ते १० जून दरम्यान दाखल होईल. तर उर्वरित राज्यात १५ ते २० जून पर्यंत येईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या पश्चिम किनारपट्टी लगतच्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. याच दरम्यान मान्सूनला अनुकूल असे वातावरण तयार झाले होते. 

महाराष्ट्रात ८ ते १० जून ला दाखल होणार !

दरम्यान यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून वेळेत दाखल झाला आहे. त्यामुळे १ जून रोजी तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अंदमान - निकोबार आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचा परिणाम दिसून येत आहे.

केरळनंतर ८ ते १० जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो. १५ ते २० जूनपर्यंत तो महाराष्ट्रात सर्वत्र हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात 'यास' नावाचे चक्रीवादळ घोंघावत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा