Breaking
ट्विटरने कंगना रनौतचे दुसऱ्यांदा खाते केले बंद ; कंगना ट्रोलची शिकार, या १५ मीम्स बघाचनवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमी आपले मत परखडपणे मांडून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर खाते ट्विटरने ब्लॉक केले आहे. कंगनाने गेल्या दोन दिवसांत अनेक वादग्रस्त ट्विट केल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ट्विटरने कंगनाचे खाते कायमस्वरूपी बंद केले आहे.


भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुका हारल्यानंतर कंगना सतत अनेक ट्विट करत होती. ट्विटर वापरकर्त्यांनी कंगनाच्या काही ट्वीटला अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंसेस प्रोत्साहित करणारे असल्याचे म्हटले होते. खाते बंद करण्यापूर्वी मंगळवारी (ता. ४) मे रोजी कंगनाने ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता एक आक्षेपार्ह ट्विट केले होते, त्यावर लोकांनी कंगनाच्या या ट्विटला रिपोर्ट केले होते, त्यानंतर ट्विटरने हे खाते कायमस्वरूपी बंद केले आहे. यावर ट्विटरने म्हटले आहे की, कंगना रनौत तिच्या 'घृणास्पद आचार धोरणाचे' सतत उल्लंघन करीत होती त्यामुळे तिचे खाते कायमचे बंद केले गेले आहे.


"दुसऱ्यांदा खाते बंद"

यापूर्वी कंगना रनौत यांचे ट्विटर अकाऊंट तिची बहीण रंगोली चंदेल सांभाळत होत्या. या खात्यावरून देखील बरीच आक्षेपार्ह ट्विटही करण्यात आली होती, त्यानंतर हे खाते बंद करण्यात आले होते. त्यानंतर कंगनाने @KanganaTeam नावाचे नवीन खाते तयार केले होते.


या प्रकरणानंतर कंगनाला ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले, त्यापैकी या काही पोस्ट...


१) 

२) 

३) 

४) 

५) 

६) 

७) 

८) 

९) 

१०) 

११) 

१२) 

१३) 

१४) 

१५) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा