Breaking


‘आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे तरी आता कोडगेपणाने सांगू नका.’ उपाध्ये यांची शिवसेनेवर टीकामुंबई : गोमांस बंदीवरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. महात्मा फुले यांचे नव्या संदर्भात उद्गार म्हणत ‘आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे तरी आता कोडगेपणाने सांगू नका.’ असे म्हणत उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हंटले आहे कि, अजानस्पर्धा व जनाब बाळासाहेब ठाकरे पाहिल्या नंतर आता सामनामध्ये गोहत्या समर्थन पाहून महात्मा फुले यांचे उद्गार नव्या संदर्भात आठवले, “सत्तेसाठी मती गेली मती विना हिंदुत्वाचा विचार गेला विचारा विना तत्व गेली तत्वविना आचार गेले आचाराविना सगळेच गेले, इतके अनर्थ एका सत्तेने केले.” अशा शब्दांमध्ये भाजप नेते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. 

 


 तसेच उपाध्ये यांनी पुढे म्हंटले आहे कि, लक्षद्वीपवर गोमांसाला बंदीचा विषय आला शरद पवार यांच्या नंतर आता इकडे शिवसेनेचा जीव कळवळला आणि सामनाच्या अग्रलेखातून बोंब केली. ‘आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे तरी आता कोडगेपणाने सांगू नका.’ असेही उपाध्ये यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा