Breaking
कामगार-महाराष्ट्र दिन आणि कार्ल मार्क्स जयंती निमित्त राज्यव्यापी ऑनलाईन व्याख्यानमाला, दिग्गज वक्ते संबोधित करणार !


मुंब कामगार-महाराष्ट्र दिन आणि कार्ल मार्क्स जयंती निमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्यव्यापी ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील दिग्गज विचारवंत, साहित्यिक, अभ्यासक संबोधित करणार आहेत.


"महाराष्ट्राचे दीपस्तंभ" शिर्षकाखाली दिनांक ५ मे ते २५ मे २०२१ पर्यंत सायंकाळी ६:३० - ८:०० या वेळेत हे व्याख्यानमाला पार पडणार आहे. काळवंडत गेलेल्या वर्तमानातून पुढे जाण्याची ऊर्मी जागवणारी आणि भविष्याचा वेध घेणारी महाराष्ट्राची सकस वैचारिक परंपरा आहे. त्या परंपरेच्या मुशीत परजलेली वैचारिक आयुधे आपल्याला सर्व विपरीत परिस्थितीतही धैर्याने वाटचाल करत राहण्याची प्रेरणा देतात. या परंपरेचा वेध या व्याख्यानमालेतून घेतला जाणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य महासचिव कॉ. नरसय्या आडम यांनी सांगितले.

सर्व व्याख्याने ऑनलाईन होणार असून खालील लिंकवर उपलब्ध असतील.
■ व्याख्यानांचा तपशील पुढीलप्रमाणे : 

१. मराठी संत आणि समाजप्रबोधन
वक्ते - प्रसाद कुलकर्णी 
अध्यक्ष : नरसय्या आडम  मास्तर
बुधवार, ५ मे २०२१

२. छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण
वक्ते - आनंद मेणसे
अध्यक्ष : उमेश देशमुख
गुरूवार, ६ मे २०२१

३. महात्मा जोतीराव फुले: क्रांतीचा असूड
वक्ते - उदय नारकर
अध्यक्ष : प्रीती शेखर
शुक्रवार, ७ मे २०२१

४. सावित्रीबाई फुले   
वक्ते - माया पंडित
अध्यक्ष : रोहिदास जाधव
शनिवार, ८ मे २०२१

५. न्यायमूर्ती रानडे: सर्वांगीण सुधारक  
वक्ते - राजा दीक्षित
अध्यक्ष : अजित अभ्यंकर
रविवार, ९ मे २०२१

६. टिळक आणि आगरकर : परिवर्तनाचे राजकारण आणि राजकारणाचे परिवर्तन
वक्ते - कुमार केतक
अध्यक्ष : विवेक मॉन्टेरो
सोमवार, १० मे २०२१

७. राजर्षि शाहू महाराज
वक्ते - जयसिंगराव पवार
अध्यक्ष : मारोती खंदारे
मंगळवार, ११ मे २०२१

८. महर्षि वि. रा. शिंदे
वक्ते - सदानंद मोरे
अध्यक्ष : सुनील मालुसरे 
बुधवार, १२ मे २०२१

९. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वक्ते - सुहास पळशीकर
अध्यक्ष : एम., एच. शेख
गुरूवार, १३ मे २०२१

१०. जेधे, जवळकर आणि प्रबोधनकार ठाकरे: ब्राह्मणेतरवाद ते समाजवाद
वक्ते - अशोक चौसाळकर
अध्यक्ष : एस. के. रेगे
शुक्रवार, १४ मे २०२१

११. डावे दीपस्तंभ: कोसंबी, बेडेकर, सरदार, नलिनी पंडित
वक्ते - दत्ता देसाई
अध्यक्ष : सुभाष जाधव
शनिवार, १५ मे २०२१

१२. बी. टी. रणदिवे व श्री. अ. डांगे
वक्ते - अजित अभ्यंकर
अध्यक्ष : मरियम ढवळे
रविवार, १६ मे २०२१

१३. क्रांतिसिंह नाना पाटील  
वक्ते - बाबुराव गुरव
अध्यक्ष : विजय गाभणे
सोमवार, १७ मे २०२१

१४. मानवतेचे जागले : गोदावरी- शामराव परुळेकर
वक्ते - अशोक ढवळे
अध्यक्ष : विनोद निकोले
मंगळवार, १८ मे २०२१

१५. भाऊराव पाटील
वक्ते - किशोर बेडकीहाळ
अध्यक्ष : पी. एस. घाडगे
बुधवार, १९ मे २०२१

१६. दादासाहेब गायकवाड
वक्ते - सुरेंद्र जोंधळे
अध्यक्ष : संजय ठाकूर
गुरूवा, २० मे २०२१

१७. अण्णाभाऊ साठे : निळ्या आकाशातील लाल तारा
वक्ते - सुबोध मोरे
अध्यक्ष : प्राची हातिवलेकर
शुक्रवार, २१ मे २०२१

१८. हमीद दलवाई आणि मुस्लिम प्रबोधन
वक्ते - रझिया पटेल
अध्यक्ष : शुभा शमीम
शनिवार, २२ मे २०२१

१९. आधुनिक महाराष्ट्रातील वैचारिक दीपस्तंभ एक संकल्पना : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे
वक्ते - गोपाळ गुरू
अध्यक्ष : कुमार शिराळकर
रविवार, २३ मे २०२१

२०. प्रबोधन और समाजवाद: समारोप
वक्ते - सीताराम येचुरी
अध्यक्ष : महेंद्र सिंह
सोमवार, २४ मे २०२१


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा