Breaking
विजय खर्डे यांची बिरसा क्रांती दल मालदा गाव शाखेच्या अध्यक्ष पदी निवड


नंदुरबार जिल्ह्यात बिरसा क्रांती दलाची पहिली मालदा गाव शाखा


तळोदा : नंदुरबार जिल्ह्यात बिरसा क्रांती दलाच्या गाव शाखा तयार करण्याची मोहीम सुरू झाली आहे.यात तळोदा तालुक्यात मालदा गावात पहिली गाव शाखा सुरू करून सुरवात करण्यात आली आहे. विजय खर्डे यांची बिरसा क्रांती दलाच्या मालदा गाव शाखेच्या अध्यक्ष पदी  निवड करण्यात आली आहे. 

बिरसा क्रांती दलाचे नंदुरबार जिल्हा प्रवक्ता राजेंद्र पाडवी व तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली गावात मिटींग घेण्यात आली व सभेत सर्वानुमते मालदा गावाची गाव शाखा तयार करण्यात आली आहे. 

मालदा गाव शाखा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

गाव अध्यक्ष विजय रतिलाल खर्डे, उपाध्यक्ष हेमंत ढगा ठाकरे, सचिव हिरामण भाईदास खर्डे, कोषाध्यक्ष विजय फकिरा खर्डे, सल्लागार संदिप उदेसिंग खर्डे, सदस्य शांतीलाल रावताळे, जगदिश खर्डे, विष्णू पावरा, अतुल खर्डे, अजित पवार, सुखदेव पवार, भावेश खर्डे, अशोक पावरा, सुरेंद्र वळवी, जगदीश रावताळे, संतोष पावरा, अजय रामसिंग खर्डे  
          
या मिटींगला बिरसा क्रांती दलाचे युवा राज्याध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे उपस्थित होते. त्यांनी मालदा गावातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या आहेत.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा