Breakingकामगारानां मोठ्या प्रमाणात लाभ देऊ - कामगार मंत्री हसन मुश्रीफ


मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोना  विषाणू रोखण्यासाठी  निर्बंध लावण्यात आले या कालावधित  कष्टकरी  कामगाराना अर्थिक मदत जाहिर केली, त्यानुसार फेरीवाला, बांधकाम कामगाराना लाभ देण्यात आला आहे, लवकरच घरेलू कामगार आणि रिक्षा चालक यानांही लाभ मिळेल. तसेच तांत्रिक बाबींमुळे लाभ नाही अशा कामगाराना लवकरच लाभ देण्यात येईल, असे राज्याचे  कामगार मंत्री हसन मुश्रीफ यानी नमुद केले. 


कष्टकरी संघर्ष महासंघाचे शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन कामगारांच्या विविध मागण्यावर  सविस्तर चर्चा केली.


महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गँध, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष  राजेश माने उपस्थिती होते.


महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणच्या कामगारांची गेल्या अनेक वर्षापासून कोरोना कालावधी आणि संगणकीय प्रक्रियेमुळे नोंदणीसाठी  इतर अनेक बाधा येत होत्या त्यामुळे कागदपत्राची पुर्तता करुन सुद्धा अनेक लोकांची नोंदणी होऊ शकले नाही त्या लोकांचाही समावेश यामध्ये करण्यात यावा लाभार्थी यादी निश्चित करण्यात यावी. तसेच मध्यान्ह भोजन योजना बऱ्याच ठिकाणी बंद आहे ती पुन्हा पूर्ववत करण्याच्या मागणीचाही विचार व्हावा, अशी चर्चा यावेळी झाली. 


या वेळेला विविध घटकांना लाभ देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांना लाभ देऊ. याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना दोन्ही वेळेला देण्याचे आदेश दिले आहेत आणि ते लवकरात लवकर मिळेल, असे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. दरम्यान घरेलू कामगारांंनी नुतनीकरण करणे शक्य झाले त्यानां ही लाभ देण्याचा निर्णया बद्दल कामगार मंत्री यांचे आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा