Breakingराज्यात लॉकडाऊन शिथिल करणार ?मुंबई : गेल्या महिन्यात देशात आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली त्यामध्ये अधिक वेगाने संसर्ग वाढत गेला. राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आता पुन्हा टप्प्याटप्प्याने शिथिल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.


गेल्या महिन्यात राज्य सरकारने कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता टप्याटप्याने राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करत तो 1 जून 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र आता पुन्हा १ जून पासून ठाकरे सरकार टप्याटप्याने लॉकडाऊन शिथिल करणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने राज्य सरकार पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडून सर्व व्यवहार सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार सुरु केले जातील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा