Breaking
युवा नेते डॉ. भाई अनिकेत देशमुख यांचे कोरोना ग्रस्तांना मदत करण्याचे कार्यकर्ते यांना आवाहनसांगोला : सध्या सांगोला तालुक्यात संसर्ग असणाऱ्या कोरोना या महामारीचा आढावा डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पुरोगामी युवक संघटनेच्या मिटिंग द्वारे घेतला. 

   

युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी प्रत्येक गटांच्या संघटनेच्या पदाधिकारी यांचे बरोबर कोरोना व इतर गावागावातील अडीअडचणी बाबत चर्चा केली. तसेच प्रत्येक गटामध्ये कोरोना संदर्भात सविस्तर माहिती घेतली व प्रत्येक गटातील, गणा मधील गावामध्ये कोरोनाची परिस्थिती व लसीकरण प्रत्येक आरोग्य केंद्रावर किती होते, रोज किती लसी मिळतात व लसीबाबत सध्याची परिस्थिती, औषध उपचार, रॕपीड टेस्ट, RTPCR टेस्ट इ. माहिती पुरोगामीच्या प्रत्येक गटातून घेतली.


युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही कोरोना संदर्भात सर्वांना मार्गदर्शन केले. व सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. पुरोगामी संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड. विशालदिप बाबर यांनीही सध्य स्थितीचे अवलोकन केले. पक्षाचे चिटणीस प्रा. विठ्ठलराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या मिटिंगचे प्रास्तविक संघटनेचे अध्यक्ष दिपक गोडसे यांनी केले. तसेच तालुका चिटणीस शिवाजी सरगर व इतर तालुका  पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


दरम्यान, युवक नेते डॉ. भाई अनिकेत देशमुख यांनी तालुका पदाधिकारी व प्रत्येक गावातील संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांना कोरोना ग्रस्त व्यक्ती व त्यांचा कुटुंबातील व्यक्तींना मदत करा असे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा