Breaking


मोठी बातमी : 11 वी प्रवेशासाठी आता प्रवेश परिक्षा, अशी असणार प्रक्रिया



मुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ.१० वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे.


विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या इ. १० वीच्या निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने इ. ११ वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेणार आहे. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ.१० वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. एकूण १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येणार आहे.


इ. ११ वी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इ. १० वी च्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल, असेही शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.


अधिक वाचा

दहावी परिक्षांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, असे होणार मुल्यमापन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा