Breaking


जुन्नर : वर्षानुवर्षे अंधारात असणारी दरेवस्ती झाली अंधारमुक्त !


जुन्नर (पुणे) : आज दि.१७ रोजी देवळे येथील वर्षानुवर्षे अंधारात असणारी दरेवस्ती झाली अंधारमुक्त झाली. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला विजेचा प्रेश्न अखेर सुटला याचा आनंद दरेवस्तीतील ग्रामस्थ व्यक्त करत आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक उत्साह जाणवला.

 
लाईट नसल्यामुळे ज्या समस्यांना आज पर्यंत तोंड द्यावे लागत होते, ते आत्ता होणार नाही. तंत्रज्ञानाच्या युगात लाईट नसणे हि खुप मोठी शोकांतिका होती, लाईट वर चालणारी उपकरणे या वस्तीत नसल्या कारणाने, लोकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्या त्रासापासून लोकांची सुटका होणार आहे.

यंग ब्रिगेड आणि ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, आणि आमदार अतुल बेनके यांच्या सहकार्यामुळे खरेतर हा प्रश्न मार्गी लागला. यासाठी आज दरेवाडी येथे भर पावसात मोठ्या उत्साहात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

यासाठी तालुक्याचे आमदार अतुल बेनके उपस्थित होते. आमदारांनी आपल्या वक्तव्यात दरेवाडी येथे रस्ता, बैरोनाथ सभामंडप, पाणी प्रश्न सोडवण्याचे   
आश्वासन दिले आहे.

यावेळी सरपंच इंदुबाई कोकणे, राष्ट्रवादी चे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, जि. प. सदस्य देवराम लांडे, देवराम नांगरे, हिरडा सहकारी कारखान्याचे चेरमन काळू शेळकंदे, मारुती वायाळ, तहसीलदार कोळेकर, बीडीओ माळी, कृषी अधिकारी सतिश शिरसाट, एम.एस. इ. बी. उप अभियंता कोळी  तसेच तलाठी तळपे, ग्रामसेवक गाडेकर हे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यंग ब्रिगेड चे कार्यकर्ते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सूत्र संचालन लहू बोऱ्हाडे यांनी केले, माजी सरपंच जनार्दन घुटे, माजी सरपंच विट्ठल बोऱ्हाडे, यंग ब्रिगेड चे अध्यक्ष धनंजय बो-हाडे, दिपक घुटे,यांनी आपल्या भाषणात गावच्या विकासासाठी कामे आमदारांपुढे मांडली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा