Breakingसोलापूर : SFI तर्फे सोलापूर विद्यापीठासमोर आंदोलन, कुलगुरूंना दिले निवेदन


विदयापीठाने परीक्षा शुल्क तातडीने माफ करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा


सोलापूर, दि. ७ : विदयापीठाने परीक्षा शुल्क तातडीने माफ करावे, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाचे सोलापूर विदयापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे मागणी केली. विदयापीठाकडून शुल्क माफ न केल्यास सदनशील मार्गाने विदयार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरतील असा इशारा दिला आहे. सोलापूर विदयापीठाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणा बाजी करत निदर्शने करण्यात आली. 

एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी म्हणाले, सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना बधितांच्या संख्या आणि मृत्यूचे दर हे झपाट्याने वाढत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षणीय प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे जनजीवन आणि प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत झालेली आहे. एकंदरीत याचा ताण अनेक घटकांवर पडलेला असून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर आणि भवितव्यावर परिणामकारक ठरत आहे. 


सोलापूर विद्यापीठाशी निगडित असलेल्या महाविद्यालयातील विध्यार्थी हे बहुसंख्य अत्यल्प उत्पन्न घठातील असून विदयापीठाचे शुल्क अधा करण्याचे आर्थिक क्षमता आजच्या घडीस नाही तरी विद्यापीठाच्या प्रशासनाने याची नोंद घेऊन सरसकट सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करावी, आग्रही मागणी कारमपुरी यांनी केली आहे.

या शिष्टमंडळात सहसचिव शामसुंदर आडम, राहुल भैसे, अश्विनी मामड्याल, लक्ष्मी रच्चा, पूनम गायकवाड, विजय साबळे, दत्ता हजारे, लक्ष्मीकांत कोंडला हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा