Breaking


मोठी बातमी : कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या १ लाख करोना चाचण्या बनावट; कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची भीतीनवी दिल्ली : कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या १ लाख करोना चाचण्या बनावट केल्याची आणि यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कुंभमेळ्यातील १ लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एनज्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 


उत्तराखंड आरोग्य विभागाने हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण १ लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एनज्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


एजन्सीकडून नमुने गोळा करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेले २०० जण राजस्थानमधील विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर असल्याचं समोर आलं आहे जे कधीही हरिद्वारमध्ये आले नव्हते.


एका प्रकरणात तर एकाच फोन क्रमांकावरुन ५० जणांचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं असून एकच अँटिजन टेस्ट किट ७०० चाचण्यांसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. “पत्ते आणि नावं काल्पनिक आहेत. हरिद्वारमधील ‘घर क्रमांक ५’ मधून ५३० नमुने घेण्यात आले आहेत. एकाच घऱात ५०० लोक राहत असणं शक्य तरी आहे का? काहीजणांनी तर मनाप्रमाणे पत्ते टाकले आहेत. घर क्रमांक ५६, अलिगड; घर क्रमांक ७६, मुंबई असे पत्ते लिहिले आहेत,” अशी माहिती तपासात सहभागी एका अधिकाऱ्याने दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा