Breaking

नवलच ! लसीचा दुसरा ढोस घेतल्यानंतर दंडाला लोखंडी, स्टीलच्या वस्तू चिकटल्या


नाशिक : नाशिक मध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. अरविंद सोनार यांनी कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतल्या नंतर त्यांच्या हाताला नाणी, लोखंडी, स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.


नाशिक मधील जुन्या सिडको परिसरात राहणाऱ्या ७१ वर्षीय अरविंद सोनार यांनी ८ दिवसांपूर्वी कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेतला होता. लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यावर कोणताही त्रास झाला नाही, असं अरविंद सोनार यांनी सांगितलं. दंडाला नाणी, लोखंडी, स्टीलच्या वस्तू चिकटत असल्या तरी त्यांना इतर कोणताही त्रास होत नसल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या शरीरावर लोखंडी वस्तू चिकटत असल्याचा व्हिडीओ त्यांच्या मुलाने इंटरनेटवर बघितला होता. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांवर तो प्रयोग केला. त्यावेळी दंडाला लोखंडी पत्रा, नाणी, स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा अरविंद सोनार यांनी केला आहे. सुरुवातीला घामामुळे असे होत असावे म्हणून अंघोळ करुन पाहिलं तर पुन्हा एकदा नाणी आणि चमचे शरीरावर चिकटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लस घेतल्यावर चुंबकत्व निर्माण होते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा