Breaking
अहमदनगर : कळसूबाई शिखर परिसरात पर्यटकांना बंदी, स्थानिक ग्रामपंचायत चा निर्णय


आमच्या गावात आमचे सरकार 


राजूर / डॉली डगळे : सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कळसूबाई या ठिकाणी महाराष्ट्र तील हजारो पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात ट्रेकिंग करीता व निसर्ग पर्यटनाचा आंनद घेण्यासाठी येत असतात. पंरतु या वर्षी कोरोना च्या भितीने स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी भीती व्यक्त करत ग्रामपंचायत च्या वतीने पर्यटकांना कळसूबाई शिखर परिसरात व गडावर जाण्यास बंदी घातली आहे.


पर्यटकांनी कोणत्याही अडवाटाने गडावर जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. बारी गाव व जहागीरदार वाडी परिसरात बाहेरील पर्यटकांचे वाहने आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा