Breaking

अजित पवारांमध्ये धमक असेल तर त्यांनी "या" मतदारसंघातुन निवडणूक लढवावी, डिपॉझिट जप्त होईल - पडळकरबारामती : स्वतःच्या जिल्ह्यात अजित पवार यांचा मुलगा लोकसभेला दीड, दोन लाखाने पराभूत झाला.
त्यामुळे बारामतीकरांनी मागील विधानसभेला माझे डिपाॅझिट जप्त केले, यावर सतत चर्चा करण्यासाठी हा विषय आता शिळा झाला, अशी टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.


घोंगडी बैठकीच्या निमित्ताने बारामती दौऱ्यावर असताना पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, बारामतीत माझे डिपाॅझिट जप्त झाल्याचे अजित पवार वारंवार सांगत आहेत. पक्षाने मला निवडणूकीच्या अवघ्या १५ दिवस आधी बारामतीतून लढण्यास सांगितले होते, त्यामुळे पवारांमध्ये धमक असेल तर त्यांनी माझ्या आटपाडी मतदारसंघात एवढ्या कमी कालावधीत निवडणूक लढवली तर त्यांचेही तेच होईल, अशी टीका आमदार पडळकर यांनी केली आहे.


माझ्याविषयी बोलण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा विषयच नाही. बारामतीत माझे डिपाॅझिट जप्त झाले ही मी मान्यच केले आहे, त्यामुळे ते माझे कुठे काय सापडतेय का, कशात अडकतोय का याची चाचपणी करतात मात्र, मी कशातच अडकत नाही म्हणून ते जुनेच मुद्दे उकरून काढत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा