Breaking
अकोले : ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनची कार्यकारणी जाहीर


अकोले/ यशराज कचरे : ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक रविवार दि. २० जून रोजी 'आदिवासी भवन' अकोले येथे उत्साहात पार पडली. याप्रसंगी संघटनेची अकोले तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली. 


यामध्ये सर्व खात्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन एकमताने यशवंत खोकले (कृषि विभाग) यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सचिवपदी विकास साबळे (शिक्षण), कोषाध्यक्षपदी वाळू मुंढे (ग्रामसेवक), कार्याध्यक्षपदी संजय गोडे (शिक्षण), महिला संघटकपदी डॉ. निता दांगट (पशुसंवर्धन), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बांबळे (महसूल), उपाध्यक्षा श्रीम.बिना सावळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. 


संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा देवेंद्र बहिरम व जिल्हा सचिव आबाजी भांगरे यांच्या मार्गदर्शनात प्रमुख अतिथींच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉ. दिलीप लोहरे यांचा संघटनेच्या राज्य संघटकपदी निवड झाल्याबद्दल व शिक्षक बँकेचे संचालक गंगाराम गोडे यांचा संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. 

मनोगत व्यक्त करताना डॉ. दिलीप लोहरे यांनी आरक्षण संदर्भातील संघटनेची भुमिका समजावून सांगितली तर गंगाराम गोडे साहेबांनी समाज बांधणीसाठी सदैव संघटनेसोबत सक्रीय राहिल असे सांगून नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी संघटनेचे जिल्हासचिव आबाजी भांगरे यांनी संघटनेचे स्वरूप व कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली व जिल्हाध्यक्ष देवेंद्र बहिरम यांनी पुढील वाटचालीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. नवनियुक्त अध्यक्ष यशवंत खोकले यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे सांगितले 

तर सचिव विकास साबळे यांनी सर्व खात्यांतील कर्मचाऱ्यांना जोडून घेऊन संघटन मजबूत करू असे सांगितले. कायदेशीर अभ्यास करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचा मनोदय कार्याध्यक्ष संजय गोडे  यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी सोमनाथ गंभिरे, श्रीम.प्रतिभा साबळे, सुनिल आढळ, भिमा जोशी, विजेंद्र साबळे तसेच तालुक्यातुन वेगवेगळ्या खात्यांतील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विकास साबळे यांनी केले तर श्रीमती. प्रतिभा साबळे यांनी आभार मानले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा